तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत..खमारी मुले शाळा प्रथम

0
270

गोंंदिया,दि.२०ः-तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवा दरम्यान आयोजित तालुकास्तरिय प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खमारी मुलेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.सदर महोत्सव पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली 17 ते 20 डिसेंबर रोजी मूरदाडा येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेत खमारी मुले शाळेतील अमित तरोणे, ऋषभ भांडारकर व हेमंत पाथोडे या विद्यार्थ्यानी प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सर्वच राऊंड मध्ये बाजी मारत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.शाळेच्या विकासासाठी पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले,जि.प.सदस्य ममता वाळवे,प.स.सदस्य कनिराम तावाडे, खमारीचे सरपंच होमेंद्र भांडारकर,उपसरपंच लिलाताई उके,अध्यक्ष राजेंद्रजी बनकर, उपाध्यक्ष ममता दोनोडे या सर्वांचे सहकार्य लाभत आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी गटशिक्षणाधिकारी प्रदीप समरीत,केंद्रप्रमुख आर.एस.चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
जि प व प्राथ. शाळेतील विद्यार्थी यांचे प्रशमंजुषा स्पर्धेत तालुक्यात प्रथम येण्याचे प्रमुख कारण म्हणजे यासाठी शाळेतील सर्व शिक्षक दैनिक परिपाठात दररोज “प्रश्न आमचे – उत्तर तुमचे ” या उपक्रमा अंतर्गत मराठी व इंग्रजीचे 10 सामान्य ज्ञानाचे प्रश्न घेतले जातात.. सोबतच इयत्ता 5 वी साठी उन्हाळी सुट्टीत व नियमित नवोदयचे वर्ग घेतले जातात.या विविध उपक्रमामुळे.खमारी मुले शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता मूल्यांकनासाठी असलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी.. शाळेचे मुख्याध्यापक संदीप सोमवंशी, सर्व शिक्षक मनोरमा राऊत, किरण कठाणे,उमाकांत उके, ललिता भुरे, प्रियंका बोरकर, स्वाती शेंडे. यांनी अथक परिश्रम घेतले.
विद्यार्थी व शाळा स्वच्छतेसाठी छन्नूबाई मडामे, अन्नपूर्णा सोरते हे मेहनत घेत आहे.गोंदिया जिल्ह्यात प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक येण्यासाठी खमारी संपूर्ण टिम प्रयत्न करत आहे.