मॉडेल कॉन्व्हेन्ट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
39

गोरेगाव :- पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत मॉडेल कॉन्व्हेन्ट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे 7 वित शिकणारे भुवन राहुल डुंभरे व आर्यन मधुकर पवार यांनी तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावत शाळेचे नाव गौरवांवित केले आहे.
भुवन राहुल डुंभरे व आर्यन मधुकर पवार यांनी स . शि.कू. वीणा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन हा उपविषय निवडत कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे यावर प्रदर्शन केले.तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत द्वितीय क्रमांक पटकाऊन शाळेचे नाव लौकीक केल्याबद्दल संस्था सचिव प्रा.आर.डी.कटरे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी सी.बी.पटले, प्राचार्य सौ सी.पी.मेश्राम, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून कौतुक केले.