अमरावती : तिवसा बस स्थानकावरील प्रवाश्यांची होणारी मोठी अडचण आता संपणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तिवसा तालुका प्रमुख आणि माजी पं. स. सभापती विलास माहूरे यांनी शिवसेना स्टाईलने केलेल्या आंदोलनाची दखल एस. टी. प्रशासनाला घ्यावी लागली आहे. तिवस्यांच्या प्रवाशांसाठी बस आता थांबणार आहे.
विलास माहूरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ला लागून असलेल्या तिवसा बस स्थानकावर बस न थांबताच किंवा प्रवाश्यांना बसमध्ये बसवून न घेता तशीच पुढे जाते, अशी तक्रार केली होती. प्रवाशांसाठी अडचणीचा ठरलेला हा मद्दा शिवसनेने लावून धरला. निवेदन देऊन मागणी केली. प्रशासनाने प्रतिसाद न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. 30 डिसेंबरपर्यंत प्रतिसाद न मिळाल्याने बैठक घेऊन चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तयारी पूर्ण झाली. आंदोलक रस्त्यावर उतरले. मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले व त्याच दिवसापासून सर्व मागण्या कार्यान्वित झाल्या आहे. एसटीचे अधिकारी बेलसरे, विभागीय नियंत्रक वानखडे, जिवन देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य आंदोलकांना मिळाले. आंदोलनात दिलीप केने, देविदास निकाळजे, शरद वानखडे, जयकांत माहुरे, अनिल कायंडे, नामदेव वानखडे, भीमराव शेंडे, गजानन पाथरे, मनोज काविलास माहूरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ला लागून असलेल्या तिवसा बस स्थानकावर बस न थांबताच किंवा प्रवाश्यांना बसमध्ये बसवून न घेता तशीच पुढे जाते, अशी तक्रार केली होती. प्रवाशांसाठी अडचणीचा ठरलेला हा मद्दा शिवसनेने लावून धरला. निवेदन देऊन मागणी केली. प्रशासनाने प्रतिसाद न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. 30 डिसेंबरपर्यंत प्रतिसाद न मिळाल्याने बैठक घेऊन चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तयारी पूर्ण झाली. आंदोलक रस्त्यावर उतरले. मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले व त्याच दिवसापासून सर्व मागण्या कार्यान्वित झाल्या आहे. एसटीचे अधिकारी बेलसरे, विभागीय नियंत्रक वानखडे, जिवन देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य आंदोलकांना मिळाले. आंदोलनात दिलीप केने, देविदास निकाळजे, शरद वानखडे, जयकांत माहुरे, अनिल कायंडे, नामदेव वानखडे, भीमराव शेंडे, गजानन पाथरे, मनोज काळे, शरद इंगळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.