अर्जुनी मोर.-नुकत्याच आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय आदिवासी आश्रम शाळा सिरेगावबांध तालुका अर्जुनी मोरगावच्या 84 विद्यार्थ्यांनी केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा शेंडा येथे सहभाग घेतला. त्यापैकी 46 विद्यार्थ्यांची प्रकल्प स्तरावर निवड झाली. त्यानंतर 16 विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर झालेल्या क्रीडा स्पर्धा बोरगाव/ बाजार येथे सहभाग घेतला. त्यापैकी सात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प देवरी अंतर्गत सहभाग घेऊन अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतापद पटकावले.
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जयकुमार कमरो या विद्यार्थ्याने 14 वर्षे वयोगटात थाळीफेक या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच क्रिस निरकलाल कडयाम व पियुष मळकाम या दोन्ही विद्यार्थ्यांनी सतरा वर्ष वयोगटात कबड्डी या खेळप्रकारात सदरच्या मुली तृतीय क्रमांक पटकावला. सन 2023- 24 या सत्रामधे झालेल्या jEE- mdin परीक्षेमध्ये आश्रम शाळा शिरेगाव बांधचे अमोल वामन कडयाम कुस श्रीराम कोरामी हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. .व jEE – Advanced परीक्षेसाठी पात्र ठरले तसेच MHT- cet परीक्षेमध्ये सात विद्यार्थी परीक्षेला बसले व सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सदर सर्व विद्यार्थी नामांकित अभियांत्रिक महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सन 2023- 24 यावर्षी झालेल्या NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेत प्रणय देवदास मस्के या विद्यार्थ्यांनी 607 मार्क घेऊन एमबीबीएसच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. व B – planning परीक्षेत ऐश्ववर्धन योगेश ढोमणे यांनी प्राविण्य प्राप्त करून भारती विद्यापीठ पुणे येथे Architecture ला प्रवेश घेतला आहे. सदर सर्व विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष चामेश्वर गहाणे यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय संस्था अध्यक्ष चामेश्वर गहाणे, प्राथमिक मुख्याध्यापक यू पी खुणे तसेच माध्यमिक मुख्याध्यापक ए एम लोथे तथा क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकांना दिले आहे.