स्नेह संमेलनाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

0
62

सटवा येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन साजरा

गोरेगांव – स्नेह संमेलन हे विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी जुळण्याचे एक साधन आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे व त्यांच्यातील सृजनशीलता व अभिव्यक्तीचे साक्षात्कार पालकांना व्हावे, यासाठी स्नेहसंमलनाची आवश्यकता असते. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे प्रतिपादन सटवा येथे जिल्हा परिषद शाळेत आयोजित दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमलनाप्रसंगी उपस्थित अतिथी यांनी मार्गदर्शन करताना केले.

सटवा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे दिनांक २६ व २७ जानेवारी २०२५ राजो दोन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात होते. यावेळी दिनांक २६ जानवारी रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच अर्चना ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसरंपच विनोद पारधी, पोलिस पाटील टिकाराम रहांगडाले, तंमुस अध्यक्ष रवींद्र कटर, माजी सरपंच रमेश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ता भागचंद्र रहांगडाले, सेवानिवृत्त शिक्षक आय. टी.ठाकूर, कृउबासचे संचालक महेंद्र ठाकूर, सेवा सहकारी अध्यक्ष डॉ.के.टी. कटरे, खरेदी विक्री संस्थेचे संचालक पुरणलाल ठाकुर, देवकांत ठाकूर, ग्रामसेविका सविता पाटील, से.नि.शिक्षक सी.एस. कटरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र रहांगडाले, ग्रामपंचायत सदस्य संजय कटरे, भूमेश्वरी महेंद्र पटले, डीलेश्वरी रामेश्वर रहांगडाले, अनिता ठाकूर, भोजराज कटरे, नूतन बिसेन, शाळा समितीचे महेश बघेले, लोकेश बघेले, रामेश्वर राणे, कुलदीप वैद्य, चंद्रशेखर ठाकूर, सिकेंद्र ठाकूर, मुख्याध्यापक त्रिलोक चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी भागचंद्र रहांगडाले यांनी विद्यार्थी जीवनात स्नेहसंमेलनाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सरपंच अर्चना रमेश ठाकूर, उपसरपंच विनाद पारधी, सेवानिवृत्त शिक्षक आय.टी . ठाकूर, कृउबासच संचालक महेंद्र ठाकूर, सेवा सहकारी अध्यक्ष के.टी. कटरे यांनीही समयोचित मार्गदर्शन करून स्न्हसंमेलनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साध्य होत असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी आंगणवाडीमधील चिमुकल्यांपासून इयत्ता आठवीपर्यतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य व नाटकांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे गोंदिया जिल्हयाची ओळख असलेल्या झाडीपट्टीच्या दंडाराचे सादरीकरणही मुख्याध्यापक त्रिलोक चौधरी यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार सहायक शिक्षक रुपेश बिसेन यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वितंसाठी मुख्याध्यापक त्रिलाक चौधरी यांच्या मार्गदर्शनात सहायक शिक्षिका वंदना पुरी, कु.गीता बोपचे, कु. प्राजक्ता चारमोडे मॅडम, आंगणवाडी सेविका प्रेमशिला रहांगडाले, सरोज ठाकूर यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.