अर्जुनी मोर. —विद्यार्थी हा मऊ मातीप्रमाणे असतो. त्याला जसं घडवले तसा घडतो. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. त्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी मेहनत करणे गरजेचे आहे. जोपर्यंत शिक्षक व पालक मेहनत करणार नाही तोपर्यंत विद्यार्थी घडणे अशक्यच आहे. असे प्रतिपादन आ. राजकुमार बडोले यांनी केले. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर येथील स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते .
नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडटोली येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नंप सभापती राधेश्याम भेंडारकर, नगरसेवक यशकुमार शहारे,नगरसेवक विजय कापगते, सुरेखा भोवते अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सु. मो. भैसारे मुख्याध्यापक मोरगाव, कैलास हांडगे संचालक ग्राहक पतसंस्था, पुनाराम जगझापे मुख्याध्यापक, नाना शहारे , नरेंद्र गायकवाड उपाध्यक्ष, नागेश मस्के, कुंदा मडावी, शिल्पा कोकाडे, दीक्षा बोरकर, कविता ढोमणे, डोमा गोंडाणे, युवराज नेवारे, अमित मडावी, जगदीश मेश्राम, युवराज नागपुरे, शेषराव दहिकर, नरेश गोंडाने, नेहरू चव्हाण उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीफुले, शारदा माता यांच्या प्रतिमां पूजनाने झाली.चिमुकल्या मुलींनी पाहुण्यांचे स्वागत गीताने सर्वप्रथम स्वागत केले.आ. बडोले यांनी शाळेला ज्या समस्या भेडसावत आहेत त्या लवकर निकाली काढन्याचे आश्वासन दिले.यावेळी नगराध्यक्षा बारसागडे, सभापती भेंडारकर, मुख्याध्यापक भैसारे आणी भोवते यांनी मार्गदर्शन केले.शाळेत प्रथमच स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका शिल्पा गहाणे तर आभार प्रदर्शन युवराज नागपुरे यांनी केले.