*गणित किर्तन* – *एक आगळीवेगळी अध्यापन पद्धती*
गणित विषय भल्याभल्यांना फार कंटाळवाणा वाटतो .परंतु या विषयाला अतिशय मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर गावातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणाऱ्या गणित प्रेमी शिक्षक राजेश कोगदे यांनी.सरांनी चक्क गणित किर्तन हा आगळावेगळा प्रयोग करत किर्तनाच्या माध्यमातून गणित विषय अतिशय मनोरंजक करुन गणित विषयाची आवड निर्माण करण्याचा आणि गणित विषयाविषयी सकारात्मक दृष्टिकोन रुजविण्यासाठी केलेला आगळावेगळा प्रयोग आज सर्व स्तरातून कौतुकाचा विषय बनला आहे.