अकोला, दि. ११ : बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून, केंद्रावरील सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी, तसेच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी विविध केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
परीक्षेत कुठेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात २२ केंद्र पथके व ६ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी सजग राहावे. कुठेही गैरप्रकार घडता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले. परीक्षा निकोप वातावरणात सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिका-यांनी बाबासाहेब उटांगळे विद्यालय, नूतन हिंदी विद्यालय आदी विविध केंद्रांना भेट देऊन तेथील सुरक्षा व सुव्यवस्थेची पाहणी केली.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैष्णवी, तसेच विविध उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनीही आपल्या क्षेत्रातील परीक्षा केंद्रांवर जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. सर्व पथकांनी सजग राहून संनियंत्रण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील भरारी पथकांनी 14 परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. यामध्ये पातुर, वाडेगाव, बार्शीटाकळी, गांधीग्राम, कान्हेरी, गायगाव, नया अंदुरा या गावांचा समावेश आहे