गोंदिया,दि.१८ः- आरटीई फाऊंडेशन महाराष्ट्र जिल्हा गोंदियाची सभा हॉटेल ग्रँड सीता येथे पार पडली.यासभेत राज्य स्तरीय कार्यकारिणी गठित करुन तुलसी शिक्षण संस्था गोरेगावचे सचिव प्रा.आर.डी.कटरे यांची बिनविरोध राज्य अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच राज्य सचिव पदी सुनील एल.आवळे,राज्य उपाध्यक्ष योगेंद्र टी.कटरे खैरबोडी, सहसचिव खलीलखान पठाण,कोषाध्यक्ष हिमांशू तेजशिंग बिसेन गोंदिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे शीवेंद्रकुमार येडे गोंदिया,विष्णुदयाल बिसेन एकोडी,प्रकाश पंचभाई गोरेगाव,श्रीमती पौर्णिमा गोंडाणे गोंदिया, सौ ज्योती दिनेश गुप्ता गोंदिया,प्रफुल भालेराव गोंदिया,प्रशांतकुमार लिल्हारे गोंदिया,अनिलकुमार येरणे देवरी,राजेन्द्र बडोले सालेकसा,संतोष राऊत सौंदड यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. राज्यअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कार्यकारिणी द्वारे प्रा.आर.डी.कटरे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.आरटीई फाऊंडेशन महाराष्ट्र गोंदिया च्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या संस्था संचालकांना शालेय स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न सतत करू अशी ग्वाही दिली.