देवरी,दि.२०-स्थानिक एम.बी.पटेल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच हलबीटोला गावाचे आर्थीक सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधत विविध प्रश्नांना हात घातला.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.वर्षा गंगणे यांनी नविन शैक्षणिक धोरणानुसार प्रकल्प निवड करून विद्यार्थ्याना सर्वेक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी सदर सर्वेक्षण प्रश्नावली तयार करून पूर्ण करण्यात आले. विद्यार्थ्याना ग्रामीण जनतेचे जीवन, त्यांच्या समस्या ,व्यवसाय,उत्पन्न ,शिक्षण इत्यादीबाबत प्रत्यक्ष माहिती जाणून त्यावर विचारमंथन करून निष्कर्ष काढण्यासाठी ग्रामस्थासोबत चर्चा करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.के.जैन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मार्गदर्शनात आर्थिक सामाजिक सर्वेक्षणाचे आयोजन अर्थशास्त्र विभागाद्वारे करण्यात आले.अर्थशास्त्राचे प्राध्यापक प्रा.मनोहर वाघेरे यांच्या सहकार्याने व अथक प्रयासाने सदर सर्वेक्षण यशस्वी झाले. हलबीटोला गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यावर विद्यार्थ्यासाठी सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्वेक्षणामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढला असून संवाद कौशल्य विकसित झाले. हलबीटोला देवस्थान कमिटी, महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.नामदेव हटवार, प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सदर कार्यक्रमासाठी सहयोग दिला.
प्राचार्यांनी अर्थशास्त्र विभागाचे या कार्याबद्दल कौतुक केले. विद्यार्थी या सर्वेक्षणावर प्रकल्प लिहितील असे अर्थशास्त्र विभागाद्वारे सांगण्यात आले. गावातील समस्या वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात येऊन त्या सोडविण्यासाठी आवेदन करण्याचे जाहीर करण्यात आले