पुरगाव – हिरडामाली रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
136

गोरेगाव,दि.०३ः तालुक्यातील पुरगाव – हिरडामाली रस्ता बांधकामाचे भूमिपूजन परिसरातील गणमान्य ग्रामस्थांच्या उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्हा वार्षीक निधीतून सदर रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असून या करिता ८३ लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. रस्त्याचे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे तसेच रस्ता रहदारीसाठी लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी पंकज रहांगडाले यांनी केले. सोबतच क्षेत्रातील विविध विकासासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. यावेळी चित्रकलाताई चौधरी, सभापती सभापती गोरेगाव (प.स.), रामेश्वर महारवाडे उपसभापती गोरेगाव, मोरेश्वर कटरे माजी सभापती जि.प. गोंदिया, अनंता ठाकरे. पुजाताई नाईक सरपंच ग्रा.पुरगाव, विनोद ठाकरे, दसाराम चौव्हान, शानसिंगजी रहांगडाले , राठोड, मुनाजी कटरे, शालिकराम पारधी, सुशिल बोगडे, घनश्याम पारधी, भरतलाल बिसेन, देवचरन रहांगडाले, डिगंबर बिसेन, तिमाजी भिमरे, मोरेश्वरॉजी रहांगडाले व इतर मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.