देसाईगंज दि.४-देसाईगंज शहराला लागूनच असलेल्या कॉरमेल ॲकाडॅमी आमगाव येथे १ मार्चला विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने ग्रॅज्युएशन डे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमला प्रमुख अतिथी म्हणून फादर कुरिअन पानियालील, संचालक ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरी,श्री. मनीष गोडबोले सहायक पोलिस निरीक्षक, श्री.नरेंद्र कुमार कोकुडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देसाईगंज, आमगाव ग्राम पंचायतचे उपसरपंच श्री.प्रभाकर चौधरी,कॉरमेल अकॅडेमीचे व्यवस्थापक फादर जोश ऑगस्टीन सीएमआय, आणि उपमुख्याध्यापिका सिस्टर लिटी मॅथीयू व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये नर्सरी ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली नृत्यकला व लगान लघुपट सादर करून प मन मोहून उपस्थित पालकांना व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून केजी टुच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पदवी देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलाने करून राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदानी तसेच शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.