ग्राम पंचायत रायपुर येथे वसुली कॅम्प मार्च अखेर शंभर टक्के वसुलीचा उद्दिष्ट

0
159

गोंदिया,दि.०४ः-पंचायत समिती गोंदिया अंतर्गत ग्राम पंचायत रायपुर येथे ग्रामपंचायत अधिकारी कमलेश बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली वसुली कॅम्प राबवून थकित खातेधारक यांचे कडून वसुली करण्यात आली. यावेळी मार्च अखेर शंभर टक्के वसुली चा उद्दिष्ट समोर ठेवुन वसुली अभियान राबविण्यात आले. सदर कॅम्प मध्ये छायाताई नेवारे सरपंच ,लक्ष्मीकांत चिंधालोरे विस्तार अधिकारी, कमलेश बिसेन ग्रामपंचायत अधिकारी, अशोक पाचे ग्राम पंचायत कर्मचारी, ज्योतिष रहांगडाले संगणक परिचालक, विनोद बागडे ग्राम पंचायत सदस्य, डॉ योगेश बिसेन सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश होता. सदर वसुली कॅम्प करीता व गावातील नागरिकांना टॅक्स भरणे प्रोत्साहित करणे कामी ओमकार मात्रे उपसरपंच , शैलेश गजभिये सदस्य , उमेश ठाकरे सदस्य, लता हटेले सद्स्य, सरस्वती टेकाम सदस्य, उषा फाये सदस्य, कल्पना कोहरे सदस्य, अल्का ठाकरे सदस्य, ओमशंकर रहांगडाले सामाजिक कार्यकर्ता, राजू रहांगडाले सामाजिक कार्यकर्ता, केवलचंद रहांगडाले माजी सरपंच, जीतलालजी रहांगडाले माजी सरपंच, मनोज कोल्हे माजी सरपंच, केवल राम रहांगडाले माजी सरपंच,डॉ सोहनलाल रहांगडाले माजी पंचायत समिती सभापती, नरेंद्र बोरकर सामाजिक कार्यकर्ता,धर्मेंद्र देशभ्रतार सामाजिक कार्यकर्ता, मनोज मेश्राम, संजय घरटे, हरिचंद बिसेन, चुन्नीलाल रहांगडाले, शालिग्राम पाचे, गुनि राम कोहरे, रूपदास दणदरे सामाजिक कार्यकर्ते , दिनेश येशने तमुस अध्यक्ष, लोकचांद बीजेवार पोलीस पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

प्रतिक्रिया
मूलभूत गरजा, आपले हक्क, अधिकार, विविध शासन योजना, सेवा, सोई, सुविधा यांचा नागरिकांकडून कडून उपयोग केला जातो त्याच प्रमाणे प्रतेक नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून वेळेत कर भरणा करून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्‍यक आहे त्यामुळे जप्तीची कार्यवाही करण्याची वेळ येवू न देता गावातील नागरिकांनी कर भरून सहकार्य करणे अपेक्षित आहे.
कमलेश बिसेन,ग्रामपंचायत अधिकारी