तुमसर जि.प.शाळेच्या खुशाल काठेवारची एकलव्य निवासी शाळेकरीता निवड

0
347

गोरेगाव,दि.२८ः नुकत्याच पार पडलेल्या एकलव्य स्पर्धा परिक्षेत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तुमसर केंद्र चोपा पंचायत समिती गोरेगाव येथील वर्ग 5 वीचा विद्यार्थी खुशाल भाष्कर काठेवार हौसीटोला या विद्यार्थ्यांने 80% च्या वर गुण संपादन करून गुणवत्ता यादीत 3 रा क्रमांक पटकावला.सदर विद्यार्थ्यांची निवड एकलव्य मॉडेल निवासी शाळा बोरगाव येथे पुढील शिक्षणासाठी झाली आहे.
यशाचे श्रेय वर्ग शिक्षक माईकल सिहारे पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक हरिराम येळणे गुरूजी, सौ. पी. एम. रंगारी स. शि., स्वयंसेवक सौ. सीमा रहांगडाले, सौ. स्वाती सरजारे यांना दिले आहे.खुशाल भाष्कर काठेवार या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी आई वडील , शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल शाळेच्या वतीने शनिवारी सत्कार करण्यात येणार आहे.