नागपूर-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भूगर्भशास्त्र विभागातील ४ विद्यार्थ्यांची एमईसीएलमध्ये अप्रेंटशिप करिता निवड करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या मिनरल एक्स्प्लोरेशन कन्सल्टन्सी लिमिटेड (एमइसीएल) या मध्ये भूगर्भशास्त्र विभागातील चार विद्यार्थ्यांची करिता निवड करण्यात आली. एमएसस्सी जिओलॉजी मधील सायली मोहन ढोक, अश्विनकुमार डाफ, कीर्ती कुमरे, जय सकरदे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विभाग प्रमुख डॉ. कीर्तीकुमार रणदिवे यांनी अभिनंदन केले आहे.