अनिल लाडे अष्टपैलु व्यक्तीमत्वाचे धनी
अर्जुनी-मोर. -आज जग विज्ञान युगात वावरत असला तरी चांगले विचार आणी संस्कार हे केवळ संत व महापुरुषांच्या विचारातुनच मिळत असते.तथागत बुध्द,संत कबीर,संत तुकाराम महाराज, संत नामदेव,कर्मयोगी गाडगे बाबा,राष्टसंत तुकडोजी महाराज,या महान संतानी आपल्या अमृतवाणीने समाजाला जागवीले.आयुष्यभर समाजजागृतीचे कार्य केले.तर महापुरुषांनी आपल्या साहित्यातुन व विचारातुन समाज बांधवांना मजबुत करण्याचे कार्य केले.आणी त्या महान संत महापुरुषांचा विचाराचा प्रचार व प्रसार करुन सत्यपाल महाराज समाजजागृतीचे महान कार्य करीत आहेत. आज ज्यांनी हा महान कार्य घडवुन आणले ते सेवानिवृत्त शिक्षक अनिल लाडे शांत सुस्वभावी आणी मनमिळाऊ व अष्टपैलु व्यक्तीमत्वाचे धनी असुन त्यांनी केलेली सेवा ही निरंतर स्मरणात राहील असे प्रतिपादन गोंदिया जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील कनेरी/केशोरी येथे डॉ राधाकृष्णन हायस्कूल येथील सहाय्यक शिक्षक अनिल लाडे यांच्या सेवानिवृत्तीपर आणि स्व. आनंदाबाई लाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुप्रसिद्ध,प्रबोधन सम्राट सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे निमीत्य आयोजीत ता.1 प्रबोधनात्मक कार्यक्रमात भेंडारकर बोलत होते.
यावेळी से.नी.शिक्षक अनिल लाडे यांनी लिहिलेल्या “सुंदर संग्रह अमृत विचारांचा” या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.अनिल लाडे परिवारातर्फे विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. अनिल लाडे यांनी समाजासाठी केलेले कार्य हे खूप मोलाचे आहे.असे मार्गदर्शन उपस्थीत पाहुण्यांनी केले.
यावेळी प्रामुख्याने सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज, पौर्णिमाताई ढेंगे सभापती महिला व बालकल्याण जि. प. गोंदिया, श्रीकांत घाटबांधे जि. प. सदस्य, यशवंत गणवीर जि. प. सदस्य, प्रकाश गहाने माजी सभापती जि. प. गोंदिया, किशोर तरोणे माजी जि. प. सदस्य,नंदकुमार गहाणे सरपंच केशोरी, अनिल लाडे, प्रदीप मस्के संचालक कृउबा समिती अर्जुनी मोरगाव, लोकपाल गहाणे, डॉ. पिंकु मंडल, घनश्याम धामट पंचायत समिती सदस्य, सचिन फटिंग उपाध्यक्ष आनंद एज्युकेशन सोसायटी, ठाणेदार गणेश वनारे केसोरी पो.स्टे.,बालाजी मोहतुरे, संजय भांडारकर, छायाताई घाटबांधे, नरेंद्र काडगाये, भागवत बडोले, हिवराज साखरे, हरीराम पेशने, रामुजी बनकर, रामुजी लंजे, महादेव चुटे, जितेंद्र देशकर, श्यामदेव रेहपाडे,दिनेश नंदेश्वर, नाजुक शेंडे, बिसेन, चेतन दहिकर, विलास बोरकर आणि खूप मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.