नीलकमल स्मृती फॉउंडेशनचा उपक्रम
सडक अर्जुनी.-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहमारा येथे ७ एप्रिल २०२५ ला शाळेच्या वतीने इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम तसेच नीलकमल स्मृती फॉउंडेशन सडक अर्जुनीच्या वतीने नवोदय विद्यालयात निवड झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार व इतर दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम थाटात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी होत्या. पुरस्कार वितरक म्हणून तहसीलदार इंद्रायणी गोमासे व पंचायत समितीचे सभापती चेतनभाऊ वडगाये होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रतिभाताई भेंडारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश शहारे, उपाध्यक्ष वनिता बडोले, केंद्रप्रमुख करुणा हुमणे, मुख्याध्यापक पी. के. कावळे,सेवानिवृत्त प्राध्यापक तथा पत्रकार डॉ. राजकुमार भगत, पत्रकार बिरला गणवीर, पत्रकार शाहिद पटेल, पत्रकार ओमप्रकाश टेंभूर्णे,दिव्यांग विभागाचे समावेशित शिक्षण तज्ञ रवींद्र गुरणुले, विशेष शिक्षक रंजू डोंगरे, विनोद फुंडे, दीनदयाल बोपचे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दीपाली रामटेके, वंदना शहारे, कृती राऊत, जयश्री शहारे, शैलेश लाडे, सुधीर राऊत,समिता राऊत,नीलकमल स्मृती फौंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम आदी उपस्थित होते.मान्यवरांनी प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहमारा येथील प्रशिक सुधीर राऊत हा नुकताच नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याची नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी निवड झाली. त्याबद्दल सडक अर्जुनी येथील नीलकमल फौंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्याकडून मुलाच्या स्मृती प्रीत्यर्थ मान्यवरांच्या हस्ते प्रशिक राऊत या गुणवंत विद्या र्थ्याला पुष्पगुच्छ,’ विद्यार्थ्यांनो जागृत व्हा’ ही पुस्तक, नोडबूक व पेन देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तेजल विलास जनबंधू, वंशिक सुधीर राऊत, ज्ञानेश उमेश शहारे, आदित्य अरुण मेश्राम, वंश जितेंद्र उंदीरवाडे आदी दिव्यांग विद्यार्थ्यांना नोडबूक, चित्रकला वही, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य
मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याद्यापक पी. के. कावळे, तहसीलदार इंद्रायणी गोमासे, पंचायत समितीचे सभापती चेतनभाऊ वळगाये, शालेय समितीच्या उपाध्यक्षा वनिता बडोले, पत्रकार डॉ. राजकुमार भगत, सरपंच प्रतिभाताई भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकेत आयोजक आर. व्ही. मेश्राम यांनी नीलकमल स्मृती फौंडेशन च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक एन. एन. पाटील यांनी केले तर आभार शिक्षक नरेश मेश्राम यांनी मानले.