34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home शैक्षणिक अवयव दान करून प्राथमिक शिक्षकांनी समाजासमोर उभा केला आदर्श

अवयव दान करून प्राथमिक शिक्षकांनी समाजासमोर उभा केला आदर्श

0
99

blank

शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदियाचा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त उपक्रम

गोंदिया-आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून गोंदिया जिल्हा प्राथमिक सहकारी पतसंस्था मर्यादित 1 द्वारे भव्य रक्तदान शिबिर व अवयव दान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळेस जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल वीस शिक्षकांनी अवयव दान प्रक्रियेत सहभाग घेऊन अधिकृत नोंदणी केली. यामुळे प्राथमिक शिक्षकांची सामाजिक बांधिलकी समाजाला बघावयास मिळाली.

समाजाचा घटक म्हणून काम करत असताना समाजातील दुर्लक्षित उपेक्षित व अंध- अपंग लोकांना न्याय देण्यासाठी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून भव्य अवयवदान शिबिर शिक्षक पतसंस्था गोंदिया येथे आयोजित केले . यावेळी संदीप तिडके, किशोर डोंगरवार,अनिल वट्टी,धर्मेंद्र बोरकर, विवेक बिसेन, राजेश रामटेके, राजेंद्र कुमार कडव, हरिराम येरणे, ओमप्रकाश मस्के, सत्यनारायण दमाहे, शोभेलाल ठाकूर, अशोक कुमार बिसेन, तुळशीराम शहारे, पुरुषोत्तम नेवारे,मंगेश मेश्राम, उमंग डोंगरवार, स्नेहा रामटेके,कृपाल रहांगडाले, पंकज रहांगडाले, कु. नीतू डहाट यांनी अवयव दान प्रक्रियेत सहभाग नोंदवून अधिकृत नोंदणी केली. याद्वारे समाजातील अंध लोकांना नव्याने दृष्टी प्राप्त होणार आहे. ज्यांचे यकृत काम करत नाही, अशांना यकृत इच्छुक दानदात्यांच्या मरणोउप्रांत प्राप्त होणार आहे. समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचे काम प्राथमिक शिक्षक बांधवांनी या शिबिराच्या माध्यमातून केले आहे यावेळी जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम यांनी भेट देऊन अवयव दानदात्यांचे कौतुक केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार, उपाध्यक्ष अशोक बिसेन, संदीप तिडके,गौतम बांते, विनोद बडोले, शोभेलाल ठाकूर,दिलीप लोदी, राजेंद्र बोपचे,उमेश रहांगडाले, सतीश दमाहे, राजेश रामटेके, सौ.भारती तिडके, कुमारी नीतू डहाट, व्यवस्थापक ज्योतीप्रकाश गजभिये यासह पतसंस्थेमधील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

blank