
गोंदिया : महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ओ.टी. टेक्निशीयन या एक वर्षीय अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निकाल १६ जुलैला लागला असुन या मध्ये एम. जी. पॅरामेडिकल कॉलेज मुर्री चौकी, गोंदियाच्या १०० टक्के निकाल लागलेला आहे. जुन २०२५ मध्ये झालेल्या परिक्षेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी कु. ईशा नेवारे या विद्यार्थीनीने ८७.००टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावीला आहे.
त्याच्यां पाठोपाठ अंकुश बावनथळे ८६.०० टक्के , कु. चेतना मेहर ८५.५७टक्के, कु. स्वाती राणा ८५.००टक्के, कु. मिनाक्षी राऊत ८५.००टक्के, गुण घेऊन यश संपादन केलेला आहे.
जिल्ह्यात पॅरामेडिकल क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम. जी. पॅरामेडिकल कॉलेजला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असुन दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय नौकरी साठी निवडले जातात. विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय कॉलेजचे संचालक अनील गोंडाणे व पालकांना दिले आहे. या यशासाठी प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. रामेश्वरी पटले प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. ललीतकुमार डबले, प्रा. मनीष चौधरी, प्रा. सौरभ बघेले, प्रा. आकाश श्रोते, प्रा. सम्येक गणवीर, राजु रहांगडाले, राजा उंदिरवाडे, योगेश्वरी ठवरे, व रूपाली धमगाये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





