28.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home शैक्षणिक दहावी, बारावीची परीक्षा होणार सीसीटीव्हीच्या निगराणीत

दहावी, बारावीची परीक्षा होणार सीसीटीव्हीच्या निगराणीत

0
217

तिरोडा, : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावी च्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षा लवकरच सुरू होत आहेत. ज्यामध्ये बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून आणि दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल. यासाठी वेळापत्रक जाहीर झाले असून, कॉपीमुक्त परीक्षेसाठी कडक बंदोबस्त आणि तयारी सुरू आहे. दरम्यान दहावी, बारावीच्या परिक्षांना घेवून अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, राज्य अध्यक्ष केरुभाऊ ढोमसे, वसंत पाटिल, मारोती खेडेकर व मराठवाड, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दहावी, बारावीच्या परिक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगारीत घेण्यात यावे, अशा सुचना सर्व विभागीय मंडळास देण्यात येणार आहेत.सभेत,केंद्रसंचालक, केंद्रातील कर्मचारी यांना स्वतःच्या केंद्राऐवजी दुसऱ्या केंद्रावर पाठवण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याबाबत, संयुक्त मुअ महामंडळाचे निवेदन जाक्र १४८ दि. २९-१२-२०२५ अन्वये याविषयावर बैठकीमध्ये सखोल चर्चे अंती राज्य मंडळाचे अध्यक्ष यांनी हा निर्णय रद्द करून तसे आदेश सर्व विभागीय मंडळास देण्यात येतील असे सांगीतले त्याच प्रमामे फेब्रुवारी/मार्च २०२६ पासून परिक्षाकेंद्रात ण्ण्ऊन बसवण्याबाबत चर्चा करण्यात आली. राज्यातील एच्. एस्. सी परिक्षा केंद्रापैकी ८५ टक्के केंद्रामध्ये तर एस्. एस्. सी परिक्षा केंद्रा पैकी ८० टक्के परिक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत उर्वरीत बारावीचे १५ टक्के व दहावीचे २० टक्के केंद्र शिल्लक आहेत. विद्यार्थी सुरक्षा व परिक्षाकाळातील परिक्षेशी संबंधीत कर्मचाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे उर्वरीत परिक्षकेंद्रानी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

blank