गोंडवाना विद्यापीठात ‘डिजिटल इंडिया’वर कार्यशाळा २१ ऑक्टोबर रोजी

0
12

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला ‘डिजिटल इंडिया’वर कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी दिली असून ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी सदर मंत्रालयाने देशभरातील १२0 विद्यापीठांची निवड केली आहे. ही कार्यशाळा २१ ऑक्टोबर रोजी आयोजित केली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. व्ही कल्याणकर यांनी बुधवार, १९ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

गोंडवाना विद्यापीठातंर्गत येणार्‍या आदिवासीबहुल भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक तंत्रज्ञानातील प्रगती, त्यामुळे उपलब्ध होणार्‍या संधी या संबंधी मार्गदर्शन प्राप्त करतील. या कार्यशाळेत तज्ज्ञ व्यक्ती आभासी सादरीकरण करणार आहेत. देशातील १२0 राज्यात ५ विद्यापीठे असून यात नागपूर विभागात गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर व जळगाव आदी सहभाग घेणार आहेत. कार्यशाळेचे उद््घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डॉ. के.वि. खादरीनरसिंमया उपस्थित राहणार आहेत. सोबतच गोंडवाना विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे २00 स्वयंसेवक, २0 कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे ३0 अधिकारी व डिजिटल इंडिया विभागाचे २0 अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी दिली.