25.1 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home राजकीय भाजपची जिल्हा विस्तारीत बैठक शुक्रवारला

भाजपची जिल्हा विस्तारीत बैठक शुक्रवारला

0
32
गोंदिया,दि.20 : भारतीय जनता पक्षाची जिल्हा विस्तारीत बैठक २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता येथील मयूर लॉन्स मध्ये आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत प्रामुख्याने पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नानाभाऊ पटोले, खासदार अशोक नेते, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, सर्व माजी आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, सर्व आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी-सदस्य, सर्व नगर परिषद नगर पंचायत पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व सक्रीय कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, भाऊराव उके, रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.