23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home शैक्षणिक गोकुळनगरच्या युवक ‘युपीएससी’ परीक्षेत देशातून 514 व्या रँकने उत्तीर्ण

गोकुळनगरच्या युवक ‘युपीएससी’ परीक्षेत देशातून 514 व्या रँकने उत्तीर्ण

0
46

गडचिरोली : नोकरीनिमित्त गडचिरोलीत येऊन गोकुळनगरात स्थायिक झालेल्या वाळके कुटुंबातील रजत सुनील वाळके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. देशभरातून 514 व्या रँकने रजन यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे हे यश वाळके कुटुंबासोबत गडचिरोलीकरांसाठी अभिमानास्पद ठरले आहे.

2021 मध्ये रजत वाळके यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली होती. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ओडिशात नोकरी करत असताना त्यांनी युपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला. अखेर त्यात त्यांना यश मिळाले.

विशेष म्हणजे रजत हे सीआरपीएफच्या नोकरीत रुजू होत असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. ते जिल्हा परिषदेत नोकरीला होते. पण त्यानंतरही रजत हे आपल्या लक्ष्यापासून विचलित झाले नाही. त्यांच्या दोन मोठ्या बहिणी स्नेहा आणि शितल शासकीय सेवेत आहेत. आता रजन यांनीही सर्वोच्च यशाला गवसणी घातल्याने वाळके कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. वडीलांचे स्वप्न आणि स्पर्धा परीक्षेची आवड यामुळे आपण हे यश मिळवू शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

blank