26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home शैक्षणिक इंग्रजी वाचन कौशल्याला चालना देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

इंग्रजी वाचन कौशल्याला चालना देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

0
33
खामगाव (प्रतिनिधी) –छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा येथे एका प्रेरणादायी व शैक्षणिक वातावरणात पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद कदमापूर मराठी प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांनी केंद्रप्रमुख रवींद्र चेके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ‘इंग्रजी वाचनाची दहा तंत्रे’ या उपयुक्त पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात ,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, प्रकल्प अधिकारी कोल्हे, उपशिक्षणाधिकारी देवकर,राठोड मॅडम, अतुल देशपांडे, केंद्रप्रमुख रवींद्र चेके , मुख्याध्यापक श्रीधर पल्हाडे ,ओपन लिंक फाऊंडेशन चे समन्वयक शे.नाजीर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. इंग्रजी वाचनाची 10 तंत्रे हे केवळ पुस्तक नसून पुस्तकातील तंत्रे पळशी केंद्रांतर्गत केंद्रप्रमुख रविंद्र चेके यांच्या मार्गदर्शनाखाली 30 व्हिडिओ तयार करून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांवर पडताळून पाहण्यात आलेला यशस्वी प्रयोग असल्याचे सांगण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाचे कौतुक करत, इंग्रजी वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी हे पुस्तक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक उपक्रमशील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब व शिक्षणाधिकारी विकास पाटील साहेब, यांच्या प्रेरणेतून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी बळ मिळत आहे.या पुस्तकातील तंत्रानुसार विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण इंग्रजी वाचन शिकू शकतो हे आम्ही प्रत्यक्ष केंद्रांतर्गत उपक्रम राबवून अनुभवले आहे .
 *रविंद्र चेके*
 *केंद्रप्रमुख पळशी बु*