दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

0
16
पुणे, दि. 29 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2017 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणा-या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावीची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च 2017 पर्यंत असणार आहे. तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च 2017 या कालावधीत होणार आहे.
 परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातील सविस्तर माहिती https://www.mahahsscboard.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. शिक्षण मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.