24.2 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home शैक्षणिक न. मा. द. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

न. मा. द. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

0
40

सलग 23 विद्यार्थी 90% पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण
गोंदिया,दि.०६— गोंदिया शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित नटवरलाल मानिकलाल दलाल महाविद्यालय, गोंदिया येथे इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे होते.कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा. रवींद्र राहागडाले, पालक प्रतिनिधी लव धोटे, महिला पालक प्रतिनिधी डॉ. स्मिता आचार्य, डॉ. शिबू आचार्य व डॉ. भावेश जसानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कपिल चव्हाण यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक आराखडा, परीक्षा निकाल व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती दिली.
परीक्षा निकाल व गुणवंत विद्यार्थी
कला विभाग (निकाल 98%)
कु. तनिषा शिबू आचार्य – 88.83% (जिल्ह्यात तृतीय क्रमांक),कु. गरिमा सुरेश गंगभोज – 84.17%,कु. पायल हेमराज पंधराम – 83.83%,कु. खुशबू आनंदराव लांजेवार – 83.83%,कु. तनवी अनुप देशपांडे – 79.83%,कु. रिया विनोद लांजेवार – 77%,कु. सिद्धी सुधीर मसानी – 76.88%,देव प्रमोद शर्मा – 76%
वाणिज्य विभाग (निकाल 100%)
कु. दीपिका राकेश माने – 97.17% (जिल्ह्यात तृतीय क्रमांक),कु. एकता अनिल गौतम – 96%,कु. माही मनोजकुमार राऊत – 94.83%,कु. रोशनी सुनील चावला – 94.13%,कु. पियूसी मानकर – 94.50%,निश्चल अनुराग अग्रवाल – 94.17%,आर्यन आशिष बनसोड – 93.83%,वंशिका अनिलकुमार चूटलानी – 93.33%,वेद इंद्रजित पटले – 93%
कु. आभा संजय चौधरी – 92.83%,मनन अमित ठाकरे – 92.50%,कु. दिशा विजय गंगवानी – 92.39%,शुभम संतोष मोटवानी – 92.33%,कु. जिया संजय खुशवानी – 91.33%,कुलदीप भरतलाल लढानी – 91.33%,कु. अनुष्का मनोज अग्रवाल – 90.67%,कु. महिमा मोहनदास गलानी – 90.17%,उद्धव रामकुमार मोदी – 90%,खुषी नरेश कुमार अग्रवाल – 90.67%,तन्मय अमित चुटलानी – 89.67%,कु. कोमल राजेश हरोडे – 89.50%,कु. कृष्णा मनीषा ज्ञानचंदानी – 89.50%,राहील लव धोटे – 89.29%या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मोहतुरे यांनी संस्थेचे संस्थापक स्व. मनोहरभाई पटेल यांच्या स्वप्नपूर्तीसाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा श्रीमती वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन व संचालक निखिल जैन यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन डॉ. संजय जगणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र राहागडाले यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. उर्विल पटेल, डॉ. रवींद्र तिडके, प्रा. चेतन मानकर, प्रा. गीता पटेल, प्रा. कविता पटेल, श्री. अनुराग नागतोडे, इशाद शेख, सेवक चौधरी व माला धोटे यांनी परिश्रम घेतले.

blank