30.7 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home शैक्षणिक आस्था नागपुरेला व्हायचेय कलेक्टर

आस्था नागपुरेला व्हायचेय कलेक्टर

0
65

गोंदिया : इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण घेणारी स्थानिक विवेक मंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी आस्था नागपुरे हिला पुढे सनदी सेवेत जायचे आहे. तिने पुढे स्पर्धा परीक्षा देऊन कलेक्टर होण्याचे स्वप्न बाळगले असून, यासाठी ती आता तयारी करणार असल्याचे आस्थाने नागपुरे हिने सांगितले. आस्थाचे आई-वडील दोन्ही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या सतत मार्गदर्शनामुळे मी ९७ टक्के गुण घेऊन इयत्ता दहावीत गोंदिया जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. मी दहावीचा अभ्यास हसत-खेळतच केला. अभ्यासाला मी टेन्शन घेऊन केले नाही. अभ्यास करण्याचे काही वेळापत्रक निश्चित केले नव्हते. परंतु दररोज अभ्यास करायची हे मात्र खरे. सततच्या अभ्यासाने खूप मोठे यश मिळते, हे या निकालावरून लक्षात आले, असे आस्था धर्मेंद्रकुमार नागपुरे हिने सांगितले. ती गोंदियाजवळील ढाकणी येथील रहिवासी असून, तिला हिंदी विषयात १० गुण कमी मिळाल्याने ती बोर्डात पुनर्रतपासणीसाठी अर्ज करणार आहे. आपल्याला सनदी सेवेत जाऊन देशसेवा करायची आहे, असे तिने सांगितले.

blank