25.8 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home शैक्षणिक सर्व विषयांत 35 गुण; ज.रा. चंडक प्रशाला, बाळे येथील विद्यार्थिनीची अनोखी कामगिरी

सर्व विषयांत 35 गुण; ज.रा. चंडक प्रशाला, बाळे येथील विद्यार्थिनीची अनोखी कामगिरी

0
107
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये ज.रा. चंडक प्रशाला, बाळे येथील विद्यार्थिनी निकिता अमोल कुचेकर हिने सर्वच विषयांत प्रत्येकी 35 गुण मिळवत एक वेगळीच नोंद केली आहे.
निकिताला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान तसेच समाजशास्त्र या सर्व विषयांमध्ये समान 35 गुण प्राप्त झाले. तिच्या या अनोख्या निकालाची परिसरात चर्चा होत असून मित्रपरिवार व शिक्षकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

blank