पक्षकारांनी केले समाधान व्यक्त
गोंदिया, 11: वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये ए. एस. प्रतिनिधी, प्र. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली तसेच एन. के. वाळके, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली शनिवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे तसेच जिल्हयातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये तडजोड पात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरणाकरीता तसेच विद्युत व बँका तसेच लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 13,665 प्रकरणांचा यशस्वी निपटारां करण्यात आला. यावेळी पक्षकारांनी केले समाधान व्यक्त
ए. एस. प्रतिनिधी, प्र. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा त्र सत्र न्यायाधीश, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ए. एस. प्रतिनिधी, जिल्हा न्यायधीश-१ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, एम. टी. असीम, जिल्हा न्यायधीश-२ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, के. एन. गौतम, जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, ए. सी. खुराणा, जिल्हा न्यायाधीश- ४, तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, एम. जे. मोहोड, मुख्य न्यायदंडाधिकारी, एस. व्ही. चरडे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, एस. व्ही. चरडे, प्र/५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्रीमती टी. व्ही. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, एस. ए. शेंडगे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व्ही. एच. शेंडे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, व्ही. एच. शेंडे, प्र/४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, एस. ओ. बोरकर, अध्यक्ष गोंदिया जिल्हा बार असोसिएशन, जि. गोंदिया व न्यायीक कर्मचारी वृंद, पक्षकार वर्ग, वकील वर्ग यांचे प्रमुख उपस्थितीत लोकन्यायालयाचे उद्घाटन, ए. एस. प्रतिनिधी, प्र. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यकमाच्या उद्घाटनानंतर ए. एस. प्रतिनिधी, प्र/अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया यांनी लोक अदालतीचे फायदे व महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच एन. के. वाळके, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन केले.
शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या न्यायालयात प्रलंबीत प्रकरणांपैकी ११३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली व रू. १,९८,४७,७१४/- रूपयांची वसुर्ल झाली. पुर्वन्यायप्रविष्ठ ४८,७४५ प्रकरणांपैकी १३,५४२ प्रकरणे निकाली काढण्यात आलो व यामध्ये रू. १,७१,३०,८९१/- रूपयांची वसुली झाली.
असे एकुण ५३,३०७ ठेवलेल्या प्रकरणापैकी १३,६५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली व एकुण रू. ३,६९,७८,६०५/- (तीन करोड एकोनसत्तर लाख अठ्ठयात्तर हजार सहाशे पाच फक्त) एवढी वसुली झाली.
त्याचप्रमाणे स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत जिल्हयातील न्यायालयामध्ये एकूण ११२ फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी ९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच १३८४ पेट्टी प्रकरण (प्लीड गिल्टी प्रकरणे) ठेवण्यात आली त्यापैकी ८९३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिव्टाली. यामुळे बऱ्याच पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे. या लोक अदालतीची विशेष बाब म्हणजे महावितरणचे तसेच विद्युत, पाणी, टेलीफोन, बॅक रीकव्हरी यांचे पूर्वन्यायप्रविष्ठ प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधित विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची संपवण्यात आली. यामुळे संबंधित विभाग व थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च व मानसिक त्रास वाचला.
प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याकरीता गोंदिया येथील एम. टी. असोन, जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, गोंदिया, एम. जे. मोहोड, मुख्य न्यायदंडाधिकारी गोंदिया, श्रीमती टी. व्ही. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर गोंदिया, एस. व्ही. चरडे, ४थे सह दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर, गोंदिया, के. व्ही. शेंडे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, गोंदिया, व्ही. एच. शेंडे, ४थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, गोंदिया, जिल्हा वकील संघ, इतर पदाधिकारी तसेच पॅनलवरील वकील अॅड. श्री. मयंक गुप्ता, अॅड. श्री. कुणाल गणवीर, अॅड. कु. दिव्या डहाके, अॅड. श्रीमती सुचना चवरे, यांनी सहकार्य केले.
सदर लोकअदालतीचे यशस्वी आयोजनाकरीता ए. आर. कुकडे, प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गोंदिया, एम. पी. पटले, एन. पी. गोखले, पी. एन. गजभिये, आर. ए. सोनकुसरे, कु. पी. डी. जंगठे, व्ही. व्ही. जाधव, एन. सी. शहरे, आर. के. पंधरे तसेच रोहित मेंढे, शिपाई, एन. बी. बहादुरे, बेलिफ व पॅरा लिगल व्हांलटीअर्स, गोंदिया तसेच इतर न्यायालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.





