अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा Email ID असणे बंधनकारक
भंडारा,दि.25:शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ साठी डी.एल. एङ प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सुचना, प्रथम वर्ष प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांचे www.maa.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
१. शासकीय कोटयातील प्रवेशासाठी दि.१1 मे 2026 ते ०१ जून २०२६ या कालावधी पर्यंत www. maa. ac.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झालेली आहे.
२. अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा Email ID असणे बंधनकारक आहे.
३. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग रूपये २००/-, खुला संवर्ग वगळून अन्य मागास संवर्गासाठी रूपये १००/-असे राहील.
४. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र व शुल्क भरावे लागेल.
५. प्रवेश अर्ज शुल्क स्विकारण्याची पध्दती प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन स्विकारले जातील.
६. प्रवेश पात्रता प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.व्ही.सी. शाखेतील पात्र उमेदवार इयत्ता बारावी खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५० टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान ४४.५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
७. व्यवस्थापन कोट्यातुन प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.
८. प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाईल.
याबाबत वर्तमानपत्रात पुन्हा स्वतंत्र जाहिरात दिली जाणार नाही. त्यासाठी उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.





