31.2 C
Gondiā
Tuesday, June 30, 2026
Home शैक्षणिक बैलबंडी फेरीने शाळा प्रवेश निमित्ताने अनोखे स्वागत; विद्यार्थी व पालकांचा फेटे बांधून...

बैलबंडी फेरीने शाळा प्रवेश निमित्ताने अनोखे स्वागत; विद्यार्थी व पालकांचा फेटे बांधून सन्मान

0
81

सडक अर्जुनी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभळी पंचायत समिती सडक अर्जुनी येथे ‘शाळा प्रवेश पहिले पाऊल’ उपक्रमांतर्गत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थी व त्यांच्या पालकांना फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. तसेच रुमालावर विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची मंगल सुरुवात करण्यात आली.यानंतर सजविलेल्या बैलबंडीत विद्यार्थ्यांना बसवून गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळाप्रवेशाचे संदेश असलेले फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत शिक्षणाचे महत्त्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचविले. या उपक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

फेरीनंतर शाळेत स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.कार्यक्रम मध्ये मुख्याध्यापक किशोर डोंगरवार यांनी प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रमुख उपस्थिती केंद्रप्रमुख एन. सी. बीजेवार मुख्याध्यापक किशोर डोंगरवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेशकुमार सोनवाने , तर माजी सरपंच विजयकुमार सोनवाने, रामेश्वरजी मेंढे, रवींद्रजी कावळे नीलकंठजी मेश्राम महेशजी पालेवार हेतरामजी राऊत अनिकेत कंगाले तसेच महिला पालक शिल्पा लटये रेखा पालेवार ज्योती पालेवार, दिव्यानी पालेवार ,मिनी पालेवार, वैशाली बोपचे ,वच्छाला कोचे, काजल कोचे ,मंगला इडपाते ,शिवकन्या सोनवाने, माहेश्वरी वाघाडे ,रत्नमाला वाढवे, वैशाली वाढवे, ज्योती उके, पूजा टेकाम ,ललिता कटकवार, जयशिलाबाई कोचे ,लिलाबाई मटाले उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील शिक्षक धम्मदीप साखरे सर भुवन बागडे सर जितेंद्र कवरे, श्यामा कुंडगीर मॅडम माया तांदळे मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले.