निपुण महाराष्ट्र सुकाणु समितीची सभा संपन्न ; गुणवत्तेसाठी डायट कटीबद्ध – राजकुमार हिवारे
गोंदिया, (दि. 2९) : निपुण महाराष्ट्र अभियानात जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने पुढील उपाययोजना सुचविण्यासाठी जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा (दि. 23) जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित सदस्यांना ‘शैक्षणिक गुणवत्तेत जिल्ह्याची प्रगती उंचावण्यासाठी योग्य ते नियोजन करावे’ असे सुचवून विविध विषयावर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया द्वारे आयोजित सुकाणू समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून त्यांच्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती निश्चितच उंचावेल व त्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) सह सर्व जिल्हा शिक्षण विभाग कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन सुकाणू समितीचे सदस्य सचिव प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी केले. सभेमध्ये निपुण महाराष्ट्र अभियानात गोंदिया जिल्ह्याची स्थिती, पी. जी. आय. 2025-26 मध्ये गोंदिया जिल्ह्याची स्थिती, केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नियोजन, आयडॉल शिक्षक निवड प्रक्रिया, शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा विश्लेषण व पुढील नियोजन, जिल्हा परिषद क. महाविद्यालयातील इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट यांचे मोफत मार्गदर्शन वर्ग, इत्यादी बाबींवार पी पी टी द्वारे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी सादरीकरण केले.
सभेला निपुण महाराष्ट्र चे जिल्हा मिशन डायरेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल्कल्याण) जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा समाजकल्याण अधिकारी कीर्तिकुमार कटरे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) पवन खंदारे, डायट चे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, शिक्षणाधिकारी /उपशिक्षणाधिकारी (माध्य.) गजानन मंदाडे, शिक्षणतज्ञ म्हणून उपस्थित असलेले बी. एड. कॉलेज चे प्राचार्य डॉ. राजेंद्र निकोसे, केंद्रप्रमुख निशा बोदेले, अध्यापकाचार्य डॉ. प्रशांत गणवीर, समाजसेविका डॉ. सविता बेदरकर, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख एन. जे. रहांगडाले, साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, विषय सहायक गौतम बांते, संदीप सोमवंशी, सुनील हरिनखेडे, दिनेश बुरबंधे उपस्थित होते.





