33.7 C
Gondiā
Monday, June 29, 2026
Home शैक्षणिक शिष्यवृत्ती, शिक्षण फी योजनेच्या लाभासाठी ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

शिष्यवृत्ती, शिक्षण फी योजनेच्या लाभासाठी ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन

0
26

मुंबई, दि.3 : सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता 11 व 12 वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी, शिष्यवृत्ती व परीक्षा फी योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अशा सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्याचे निदेश महाविद्यालयांच्या प्राचार्यांनाही देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी मिळण्यासाठी प्रथम वर्षाचे अर्ज तात्काळ ऑनलाईन भरावेत. ऑनलाईन अर्ज भरणे व अर्जाचे नुतनीकरण करण्याची सुविधा https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर असून सर्वांनी मुदतीच्या आत अर्ज भरावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे .