डिजीटल शाळांच्या विद्यार्थ्यांची बाराखडीच कच्ची

0
8

मुख्य कार्यकारी अधिकाºयांची खंत : शिक्षक, मुख्याध्यापकांवर वॉच ठेवण्याचा सल्ला
गोंदिया ,berartimes.com दि.१५: जिल्ह्यातील जिल्हा परिषदेद्वारे संचालित शाळा डिजीटल होत आहेत. या शाळांतील विद्यार्थी विज्ञान युगात देखील तग धरून राहाव्यात या दृष्टीने राज्य शासनाच्या उद्दीष्टांकडे या शाळा धाव घेत आहेत. फेब्रुवारी अखेर शाळा डिजीटल होणार आहेत. मात्र, अनेक शाळा डिजीटल झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्या शाळांतील विद्यार्थ्यांची बाराखडीच कच्ची आहे. त्यामुळे आता पदाधिकाºयांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर वॉच ठेवावा, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केले आहे. त्यामुळे आता शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांवर जबाबदारी वाढली आहे.
गावातील बालकांची शंभर टक्के पटनोंदणी, १०० टक्के उपस्थितीकरिता दक्षता घेणे, शाळाबाह्य मुलांना शाळेत आणणे आणि त्यांची उपस्थिती टिकवून ठेवणे, शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पÑगतीचा अढावा घेणे, श्ौक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, शालेय बांधकामे आणि दुरुस्त्यांवर देखरेख ठेवणे, नियमीत सभा घेणे आदी कामे नियमीतपणे शाळा व्यवस्थापन समितीद्वारे करण्यात येतात. त्याचबरोबर अनेक शिक्षक देखील विविध नवोपक्रम शाळांमध्ये राबवित आहेत. उत्तम लोकसहभाग लाभत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा आता खासगी शाळांच्या बरोबरीने उभ्या राहू पाहत आहेत. हे परिवर्तन योग्य दिशेने होत आहेत.
गेल्या वर्षभरापासून शाळा लोकसहभागातून डिजीटल करण्यावर भर देण्यात येत आहे. फेब्रुवारी अखेर जिल्ह्यातील सर्वच शाळा डिजीटल करण्यावर भर देण्यात आला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी डिजीटल झालेल्या अनेक शाळांना भेटी दिल्या. त्यांनी भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचे अभ्यासक्रम नीट वाचता येत नाही, गणित आणि इंग्रजी विषयाचे ज्ञान कच्चे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची खंत व्यक्त केली. केवळ शाळा डिजीटल करून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, याकरिता प्रयत्न करण्याचा सल्ला सीईओ पुलकुंडवार यांनी दिला आहे. ही दरी भरून काढण्याकरिता त्यांनी आता शाळा व्यवस्थापन समित्यांनी अधीक प्रभावीपणे शाळांकडे लक्ष पुरविण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याकरिता दर पंधरा दिवसांतून सुटीच्या दिवशी एक बैठक लावून शाळेची प्रगती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा, असे पत्र काढले आहे. यासंबंधाने मुकाअ डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १० फेब्रुवारी रोजी एक पत्र काढून शाळा व्यवस्थापन समित्यांना पाठविले. त्या पत्रात जे विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमात कच्चे आहेत, त्यांच्याकरिता शनिवारी दुसºया सत्रात विशेष वर्ग भरविणे यासह पालकांनी देखील त्यांचा सराव घरी घेण्याचे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले.