नागपूर दि. ८ : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ दिनांक ९ मार्च २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव तथा कुलपती, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील तर सन्माननीय अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलपती डॉ. त्रीलोचन मोहापात्रा, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे सचिव तथा महासंचालक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत.





