बोरगाव/बाजारची आश्रमशाळा झाली डिजिटल

0
21

देवरी दि.10–: तालुक्यातील बोरगाव/बाजार येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा तथा एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल ही लोकसहभागातून डिजिटल झाली. डिजीटल शाळेचे उद््घाटन या क्षेत्राचे आ.संजय पुराम यांच्या हस्ते आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी माजी आ.रामरतन राऊत, आदिवासी सेवक प्रल्हाद भोयर, सरपंच पुनाराम तुलावी, प्राचार्य डॉ.जगदीश बारसागडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शाळेचे प्राचार्य बारसागडे यांनी आपल्या प्रास्ताविकात या डिजिटल इंडिया उपक्रमात आदिवासी विकासचे आयुक्त राजीव जाधव, अप्पर आयुक्त डॉ.माधवी खोडे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, नंदकुमार, मनिषा वर्मा, उल्हास नरड, जितेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेतून समाजाच्या सहभागाने आणि लोकांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व प्रशिक्षण रंगक आणि मनोरंजनात्मक करून शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी करण्यात येत असल्याचे सांगून यात लोकवर्गणी व पालकांच्या सहकार्याने इ-लर्निंग सुरू करणारी नागपूर विभागातील ही पहिली आश्रम शाळा ठरली आहे. या शाळेत विविध पुस्तकांनी सुसज्ज असे ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, स्वच्छ शाळा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, वृक्ष लागवड, संवर्धन, व्यक्तीमत्व विकास मार्गदर्शन शिबिर असे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे शाळेत समाज व पालक यांनी डिजिटल शाळा करण्यासाठी आमच्या शाळेवर जे प्रेम व सहकार्य दिले आणि ही डिजिटल शाळा उदयास येण्यामध्ये आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात ज्यांनी मौलाचे सहकार्य केले. अशा सर्वांचे यावेळी प्राचार्य डॉ.जगदीश बारसागडे यांनी आभार माणून असेच प्रेम व सहकार्य सदैव आमच्या शाळेवर रहावे अशी सदीच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी डिजिटल इंडिया या विषयावर अमुल्य मार्गदर्शन केले.संचालन विलास बारसागडे यांनी तर आभार भारत पंधरे यांनी मानले.