गोंदिया : आर्थिक व्यवहाराच्या आरोपात चौकशीच्या फेर्यात असलेले जिल्हा नियोजन अधिकारी के.श्रा.तिडके यांची गडचिरोली येथे जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) या पदावर बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश दि. ६ मार्चला अवर सचिवांनी काढला. त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आली आहे.




