शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते तुलसी खोटेले पुरस्कृत

0
10

गोंदिया,दि.२३(berartimes.com): ज्ञान की मॉनिटर महाराष्ट्र या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत जि.प. वरिष्ठ प्राथ. शाळा अदासीची विद्यार्थीनी तुलसी भरत खोटेले हिने यश संपादन केल्याबद्दल राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते तिला पुरस्कृत करण्यात आले.गावचे पाणी-नियोजन व सिंचन या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात उत्कृष्ठ बुद्धीकौशल्याची सांगड घालत दज्रेदार निबंध लिहीत तिने यश संपादन करून जिल्ह्याचे नाव राज्यात उंचाविले. याबद्दल राज्याचे शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले. तिच्या यशस्वीतेबद्दल शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक नरेंद्र बिसेन, पी.आर.मुरकुटे, सी.एस. मरकाम,जी.एस.बोपचे, के.एम. पटले, आर.एन. नंदेश्‍वर, पी.के.गेडाम यांनी अभिनंदन केले.