गोंदिया, दि.८ : राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सन २०१३-१४ मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंना शासनामार्फत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. या शिष्यवृत्तीची रक्कम खेळाडूंच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन ट्रांसफर करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र खेळाडूंची यादी ीेिीींी.ारहरीरीहींीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांनी बँक खात्याबाबत माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदियाच्या वीेसेपवळर२०१ऽसारळश्र.लो या संकेतस्थळावर किंवा थेट कार्यालयात सादर करावी. विहीत नमुन्यातील माहितीमध्ये खेळाडूचे नाव, पत्ता, बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, खातेधारकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.