शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

0
18

गडचिरोली : सन २0१३-१४ या शैक्षणिक सत्रात काही अभ्यासक्रमाचे निकाल उशीरा जाहीर झाले. तसेच ग्रामीण भागामध्ये विद्युत भारनियमन, इंटरनेट सुविधांचा अभाव व इतर समस्यांमुळे काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीबाबतचे ऑनलाईन अर्ज विहित वेळात भरता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना सन २0१४-१५ मध्ये शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीबाबतचे ऑनलाईन अर्ज करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
सन २0१३-२0१४ मध्ये ज्या विधार्थ्यांचे अर्ज भरण्याचे राहून गेले आहे ते विद्यार्थी सन २0१३-२0१४ चे अर्ज भरण्यासाठी १६ जानेवारी २0१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सन २0१४-२0१५ साठीचे ई-शिष्यवृत्ती (नवीन आणि नूतनीकरण), राजर्षी शाहू महाराज, विद्यावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २0१५ आहे. वेबसाईट संथगतीने चालते व अर्ज भरण्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अंतिम दिनाकांची वाट न पाहता मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्वरीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.