कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा

0
18

चंद्रपूर: येथील चंद्रपूर जिल्हा तथा शहर कॉंग्रेस कमिटीची सभा पार पडली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे वमाजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया, बल्लारपूर नगरपरिषदेच्या अध्यक्ष छाया मडावी, माजीअध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, रजनी मुलचंदानी, दिलीप माकोडे, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेसचे महासचिव अँड.अविनाशठावरी, नगरसेवक तथा जिल्हा कॉंग्रेसचे महासचिव अशोक नागपुरे, प्रविण पडवेकर, चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष डॉ.महाकुलकर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माणिकराव ठाकरे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवाने कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हतबल झाल्यासारखे दिसतात. परंतु आपले मनोबल जराही खचू न देता संयमाने, निष्ठेने व जिद्दीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे सांगून ठाकरे यांनी केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाप्रणित सरकार आहे. मात्र ही सरकारे लबाड आहेत. त्यांनी निवडणूक काळात खोटी आश्‍वासने दिलीत, असा आरोप केला.
यावेळी डॉ.नितीन राऊत यांनीही मार्गदर्शन केले. कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नरेश पुगलिया म्हणाले, कॉॅॅॅॅंग्रेस पक्षाची सभासद नोंदणी सुरू आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोहिमेअंतर्गत सभासद नोंदणी करावी असे सांगून कार्यकर्त्यांनी निराशा व मरगळ झटकून नव्या उत्साहाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
संचालन गजानन गावंडे यांनी तर आभार घनश्याम मुलचंदानी यांनी मानले. या सभेला महापालिकेचे गटनेते प्रशांत दानव, नगरसेविका उषा धांडे, अनिता कथडे, सुनिता अग्रवाल यांच्यासह अनेक नगरसेवक, कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.