जि.प.सीईओच्या भेटीने जमाकुडो आश्रमशाळेतील अव्यवस्थेचे बिंग फुटले

0
7
१२ वीच्या विद्यार्थानांही माहीत नाही मुख्यमंत्र्यासह पालकमंत्र्याचे नाव
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.१५ः  गोंदिया जिल्हा हा आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.या आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील आदिवासी मुलांने चांगले शिक्षण मिळावे यासाठी आदिवासी एकात्मिक प्रकल्प विकास कार्यालयाच्यावतीने शासकीय आश्रमशाळा गोंदिया जिल्ह्यात चालविण्यात येत आहेत.त्यामध्येच सालेकसा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या जमाकुडो येथे सुध्दा देवरी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतंर्गत शासकीय आश्रमशाळा गेल्या अनेक वर्षापासून चालविण्यात येत आहे.परंतु या आश्रमशाळेत किती अव्यवस्था आहेत याचे चित्र मंगळवारला जेव्हा गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जमाकुडो येथील दौèयावर गेले असता उघडकीस आले.
विशेष म्हणजे या दौèयादरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे,सेवानिवृत्त वैद्यकिय अधिकारी डॉ.सतिश जायस्वाल यांच्यासह वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे हे सुध्दा सहभागी झाले होते.जेव्हा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याॉंची पाहणी करण्याकरीता आश्रमशाळेतील वर्ग खोल्याॉत प्रवेश करण्यात आले,तेव्हापासून तर निघेपर्यंत आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह सर्वच शिक्षकांचे वागणूक हे प्रशासनाला शोभेल असे कुठेच दिसून आले नाही.वास्तविक जेव्हा सीईओ रविंद्र ठाकरे हे वर्गामध्ये भेटी देऊ लागले तेव्हा मुख्याध्यापक कळंबे हे खुल्या पटागंणात विद्याथ्र्यांना कुठे गेला काय करतो वार्डन कुठे गेला हे विचारण्यातच गुंग होते.
जमाकुडो आश्रमशाळेत विद्यार्थीनींसाठी पलंग नसलेला हाॅल
जमाकुडो आश्रमशाळेत विद्यार्थीनींसाठी पलंग नसलेला हाॅल

जेव्हा की वरिष्ठ अधिकारी आले तर त्यांना सविस्तर माहिती देण्याएैवजी गोंधळलेल्या स्वरुपात दिसून आले.त्यातच या आश्रमशाळेच्या इयत्ता १२ वी कला शाखेच्या विद्याथ्र्यांना तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोन आहेत तेच माहित नाही नव्हे तर,जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष,जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीही नावे माहित नसल्याचे वर्गात विचारणा केल्यावर समोर आले.त्यावेळी वर्गात हजर असलेल्या शिक्षिका सुध्दा हतबल दिसून आल्या. जेव्हा या विद्याथ्र्यांना विचारणा करण्यात आली,तेव्हा राज्यशास्त्र या विषयाचा तास सुरु होता,हे मात्र नेमके विशेष ठरले.अनेक विद्याथ्र्यांना आपल्या भागातील लोकप्रतिनिधींची नावेच माहित नसल्याने त्यांना या शाळेत काय शिक्षण दिले जात असतील याबद्दल न बोललेच बरे अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

या आश्रमशाळेचा अधिक्षक असलेला वार्डन हा आरोग्य उपकेंद्रांत मुलांना उपचारासाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला मात्र तो अधिकारी शाळेतून निघेपर्यंत परतलचा नव्हता.जेव्हा की सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी शाळेत परत आल्या होत्या.यावरुन त्या वार्डनवर सुध्दा कुणाचेच नियंत्रण नसल्याचे समोर आले तर विद्यार्थी व विद्यार्थींनीनी दिलेल्या माहितीनुसार सदर वार्डन हा आठवड्यातून दोन तीन दिवस दररोज दारू पिऊन राहत असल्याचे समोर आले.त्यामध्येच विद्याथ्र्यांना जेवणात गेल्या महिन्यापासून अंडी देण्यातच आलेली नाही.चहा तर दिलाच जात नाही तर दुधाचा प्रश्न उरला नाही.जेवणातही जे स्वाद असायला पाहिजे ते नसल्याचे बहुतांश विद्याथ्र्यांचे म्हणने होते.शिक्षक शिकविण्याप्रती कुठेच उत्साही दिसून येत नव्हते उलट ते वेळ कसा निघतो यातच मग्न बघावयास मिळाले.जि.प.चे सीईओ ठाकरे आले हे जेव्हा लक्षात आले तेव्हा कुठे काही शिक्षक वर्गात जाऊन शिकवू लागले अशी अवस्था त्या आश्रमशाळेची असून त्यातच मुलीसांठी असलेल्या शौचालयात घाणीचे साम्राज्य तर अपुèया पलंगामुळे विद्यार्थींनी खालीच बेडवर झोपण्याची वेळ आलेली आहे.७० ते ८० मुली या गेल्या दोन चार वर्षापासून खालीच झोपत असून त्यांना अद्यापही पलंग उपलब्ध करुन दिलेले नसल्याचे समोर आले.खिडक्यांच्या काचा फुटलेल्या तर पिण्याचे पाणी पुरविणारी मशीन बंद असल्याने मुले मुलींना नळाचेच पाणी प्यावे लागत आहे.

जमाकुडो आश्रमशाळेती घाण असलेले शौचालय-
जमाकुडो आश्रमशाळेती घाण असलेले शौचालय-
या सर्व आश्रमशाळेची पाहणी केल्यानंतर व विद्याथ्र्यांशी आणि काही शिक्षकांशी केलेल्या सवांदानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी शाळेतूनच आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांना भ्रमणध्वनी करुन शाळेतील अव्यवस्थेची माहिती देत,नापसंती व्यक्त केली.त्यावर चौधरी यांनी आश्रमशाळेतील अव्यवस्थेबाबत मुख्याध्यापकांना त्वरीत कारणे दाखवा नोटीस देत असल्याची माहिती श्री ठाकरे यांना दिली.