25.9 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home शैक्षणिक मुख्याध्यापकांचे 17 वे जिल्हाधिवेशन खजरी/डोंगरगावला

मुख्याध्यापकांचे 17 वे जिल्हाधिवेशन खजरी/डोंगरगावला

0
24

गोंदिया,दि.23ः- गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ द्वारा आयोजित जिल्हा मुख्याध्यापकांचे 17 वे जिल्हास्तरीय शैक्षणिक सम्मेलन  2 जानेवारी मंगळवारला सकाळी 10 वाजता आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खजरी/डोंगरगाव ता.स/अर्जुनी येथे आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर राहणार असून संम्मेलनाचे उद्घाटन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून जगत कल्याण शिक्षण संस्था साकोलीचे अध्यक्ष जे.एस.रहागंडाले तथा स्वागताकार्याध्यक्ष एन.एन.येळे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, आमदार ना.गो.गाणार,शिक्षणाधिकारी(माध्य.) प्रफुल कचवे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी ( माध्य.) सुनिल मांढरे, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रभारी जिल्हा क्रिडाधिकारी सुभाष गागंरेड्डीवार ,सतिश जगताप सचिव विदर्भ मुख्याध्यापक संघ,नरेंद्र वाळके राज्य मुख्याध्यापक संघ,अनिल बाळसराप,अशोक पारधी,सत्यशीलाताई गायकवाड,राजेश कठाणे,के.वाय.सर्याम,एन.जे.रंहागडाले उपस्थित राहणार आहेत. सर्व व्यवस्थापनातंर्गत द्वारा संचालीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.