‘द दारुचा नव्हे द दुधाचा’ व्यसनविरोधी रॅलीने दुमदुमले शहर

0
13
महाराष्ट्र अंनिसचे आयोजन
आकाश पडघन,
वाशीम – दि. 23 ः महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आज 23 डिसेंबरला  व्यसनविरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीची सुरुवात करण्यात आली. शहरातील महीला व सामाजीक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दारुच्या प्रतिकात्मक बाटलीला चपलांचा हार घालून व्यसनाला बदनाम करण्यात आले. प्रसिध्द मानसोेपचार तज्ञ डॉ. नरेश इंगळे, डॉ. मंजुश्री जांभरुणकर, डॉ. विक्रम चौधरी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी बाळासाहेब बोराडे, समाजकल्याण निरिक्षक केवलकुमार बिजवे, पोलीस निरिक्षक जगदाळे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला मार्गस्थ केले. रॅलीत म. फुले कला, क्रीडा व शिक्षण बहूउद्देशिय संस्था उमरा शमशोद्दीनच्या कलापथकांनी व्यसनविरोधी गिते व पथनाट्य सादर करुन प्रबोधन केले. श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनींनी व्यसनविरोधी पत्रके वाटून जनतेला व्यसनाच्या आहारी न जाण्याचा संदेश दिला. रॅलीचा समारोप डॉ. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन करण्यात आला. यावेळी नागार्जुन बौध्द अल्पसंख्यांक बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने रॅलीत सहभागी सर्व कलावंत मंडळींना प्रमाणपत्र व पदक देवून गौरविण्यात आले. रॅलीमध्ये युवा शाहीर संतोष खडसे, जनार्धन भालेराव, सुभाष सावळे, सुनिल सावळे, गाडगेबाबांच्या भूमिकेत दत्ता वानखेडे, शाहीर नामदेव दिपके, महिलेच्या भूमिकेत अमोल वानखेडे, संजय सुरडकर, गजानन खडसे, काशीराम खडसे, समाधान भगत, शंकर गवळी, सदानंद इंगोले, प्रकाश खडसे, असीत खडसे, साहेबराव पडघान, जादुगार पंढरीनाथ दवने, सुभाष इंगोले, समाधान सावंत, क्रांती कातडे, धनराज गुडदे, दत्तराव मोरे, चोखाजी इंगोले आदी कलावंतांनी विविध कला व वेषभुषा सादर करुन व्यसनविरोधी गीत व पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाला प्रा. अशोक वाघ, प्रा. अतुल राऊत, प्रा.डी.एस. अंभोरे, डॉ. विक्रम चौधरी, प्रा.यु.एस. जमधाडे, विनोद पट्टेबहादुर, प्रा. उन्मेश घुगे, प्रविण पट्टेबहादुर आदींचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. रॅलीचे संयोजन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती वाशीमचे पी.एस. खंदारे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागार्जून संस्थेच्या अध्यक्षा कुसुमताई सोनूने, दत्तराव वानखेडे, समाधान सावंत, क्रांती कातडे, धनराज गुडदे, सुभाष इंगोले आदींनी अथक परिश्रम घेतले.