हर्षने तयार केली लुनापासून बाईक

0
10

आमगाव,दि.09: येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी हर्ष नरेश अग्रवाल याने तयार केलेल्या प्रतिकृतीला तंत्रप्रदर्शनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला.हर्षला लहानपणापासूनच विज्ञान विषयात रुची आहे. सध्या तो आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात (एमसीव्हीसीला) बाराव्या वर्गात शिकत आहे. गोंदिया येथील शासकीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात एम.सी.व्ही.सी. व आयटीआयच्या विद्यार्थ्यांकरिता संयुक्तपणे तंत्र प्रदर्शन घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक चंद्रकांत निनाळे, सहायक संचालक मेहंदळे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणचे अधिकारी घुले यांनी प्रदर्शनाला उपस्थित राहून प्रतिकृतींची पाहणी करुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले होते.हर्षने जुन्या लुनापासून तयार केलेल्या मॉडिफाईड बाईकला प्रथम क्रमांक देऊन त्याचा सत्कार केला.