लाखनी येथे ऑनलाइन सामान्य ज्ञान परीक्षा

0
16

स्वप्नपूर्ती फाउंडेशन आणि आकृती कंप्यूटर्सचा उपक्रम

लाखनी,दि.09ः- स्वामी विवेकानंद जयंती देशभरात युवा दिन म्हणून साजरी केली जाते. याच निमित्ताने लाखनी येथे स्वप्नपूर्ती फाउंडेशन आणि आकृती कंप्यूटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने “खुली ऑनलाइन सामान्य ज्ञान परीक्षा” आयोजित करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे जीवनचरीत्र हा या स्पर्धेचा विषय आहे. दि. १२ ते १४ जानेवारी २०१८ दरम्यान विद्यार्थ्यांना ही परीक्षा सकाळी १० ते संध्या. ५ या वेळेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आकृती कंप्यूटर सेंटर लाखनी येथे देता येईल. परीक्षा देण्याआधी प्रत्येक विद्यार्थ्यांनी पूर्व नाव नोंदणी करने आवश्यक आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी किशोर वाघाये मो. 9423413474, लक्ष्मण बावनकुळे मो. 7875578762, प्रशांत वाघाये मो. 8275397380 यांच्याशी संपर्क साधता येईल.
ज्याप्रमाणे आता सर्व स्पर्धा परीक्षा ह्या ऑनलाइन प्रणालीने होतात तशीच ही ऑनलाइन परीक्षा होईल, या निमित्ताने ऑनलाइन परीक्षा आणि तिचे स्वरुप कसे असते याची देखील माहिती विद्यार्थ्यांना होईल. त्यामुळे माननीय पालक तथा समस्त शिक्षकवृंदांनी आपले पाल्य, विद्यार्थी या परिक्षेसाठी पाठवावेत असे आवाहन स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये, सचिव सुधीर काळे, सल्लागार अंगेश बेहलपांडे, अतुल भांडारकर, आकृती कंप्यूटर्सचे संचालक किशोर वाघाये, स्पर्धा संयोजक लक्ष्मण बावनकुळे यांनी केले आहे.