१२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र तयार

0
10

गोंदिया,दि.१० : जिल्हा जात प्रमाणपत्र समिती अंतर्गत सन २०१६-१७ व २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ऑगस्ट २०१७ पर्यंत १२ वी विज्ञान शाखेत ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत किंवा स्वत: जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज सादर केले होते त्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र (त्रुटीचे प्रकरणे वगळून) तयार झाले आहे. अर्जदार/पालक यांनी जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, गोंदिया येथून घेवून जावे. जात वैधता प्रमाणपत्र घेवून जाण्यासाठी पालक किंवा विद्यार्थ्यांनी स्वत:चे ओळखपत्र, अर्जदाराचे जात प्रमाणत्र, मुळ व झेरॉक्स प्रत सोबत आणावे. असे उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया यांनी कळविले आहे.