जलयुक्त शिवार अभियान व जलसंधारणाची कामे  जलसमृध्दी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना

0
15

३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले
गोंदिया,दि.१० : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि संरक्षीत सिंचनासाठी जलयुक्त शिवार अभियान आणि जल व मृद संधारणाची कामे महत्वाची आहे. ही कामे करण्यासाठी शासनाने जलसमृध्दी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी सुशिक्षीत बेरोजगार, तरुण/शेतकरी उत्पादन संस्था, नोंदणीकृत शेतकरी गट, बेरोजगार सहकारी संस्था, विविध कार्यकारी संस्था यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना उत्खनन सामुग्री खरेदी करण्यासाठी वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचे दायित्व शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१८ आहे. जिल्ह्यासाठी ५० लाभासाठी निवडीचे उद्दिष्ट दिले आहे. लाभार्थ्याकडे स्वत:च्या मालकीची यंत्रसामुग्री नसावी. तसेच स्वत:चा हिस्सा किंवा २० टक्के रक्कम उभारणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याची निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा जिल्हा मृद संधारण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड समिती गठीत करण्यात आली आहे. लघुसिंचन (जलसंधारण)चे कार्यकारी अभियंता तथा जिल्हा संधारण अधिकारी हे सदस्य असून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था हे सदस्य सचिव आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज हींींीि://शाश.ारहरेपश्रळपश.र्सेीं.ळप या लिंकवर दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या ऑनलाईन अर्जाची जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये छाननी करण्यात येईल. या समितीच्या बैठकीत पात्र ठरलेले प्रस्ताव राज्य सहकार विकास महामंडळाकडे सादर करण्यात येईल. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव यांनी केले आहे.