गोंदिया : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था पतसंस्था र्मयादित गोंदियाच्या कोहमारा शाखेतून एका शिक्षकावर कर्ज असतानाही कर्ज नसल्याचे दाखविले. त्याला आंतरजिल्हा बदलीसाठी मोकळे करण्यात आले.
सडक/अर्जुनी तालुक्याच्या प्राथमिक शाळा खजरी येथे कार्यरत अशोक नवनाथ राख या शिक्षकांची जून २०१४ मध्ये आंतरजिल्हा बदली झाली. त्या शिक्षकाला मोकळे करण्यासाठी संस्थानचे व बँकाचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. जून २०१४ मध्ये या शिक्षकावर ४लाख ३२ हजार १९५ रुपये घेणे बाकी होते. परंतु सत्ताधारी संचालकाच्या मर्जीतील तो शिक्षक असल्यामुळे कोहमारा शाखेच्या लेटर पॅडवर कर्ज नसल्याचे खोटे प्रमाणपत्र सडक/अर्जुनी पंचायत समितीला देण्यात आले. त्या अर्जावर तारीख नाही जावक क्र. नाही तरी ही हे पत्र देण्यात आले.ते पत्र खरे की खोटे याची शहानिशा न करता खंडविकास अधिकारी यांनी जि.प.परभणीला सदर शिक्षकाला जाण्यासाठी मोकळे केले.