कर्तव्यशून्य भाजपनेता जि.प.च्या जलसंधारण समिती सदस्यपदी कसा?

0
34

गोंदिया– कधीही साधी प्रभागातील निवडणूक लढण्याची qहमत केली नाही. कंत्राटदारीच्या माध्यमातून मात्र पक्षाच्या नावाखाली प्रचंड माया गोळा केली. असे असताना जे कार्यकर्ते आपल्या श्रमाच्या जोरावर जनतेतून निवडून आले, त्यांच्यावर हुकमत गाजवीत भाजप म्हणजे काय, हे त्याच लोकप्रतिनिधींना हिनवत समजावण्याचा प्रयत्न करणाèया व्यक्तीला भाजपने जलसंधारण समितीच्या सदस्यपदी घेतले. जर अशा कर्तव्यशून्य आणि आयत्या पीठावर रेघा ओढणाèयांना काडीचाही संबंध नसताना महत्त्वाच्या पदावर घेण्यात येत असेल, तर कार्यकत्र्यांची गरजच काय? असा सवाल आता पक्ष कार्यकत्र्यांनी पक्षश्रेष्ठींच्या पुढ्यात उभा केला आहे.
ग्रामीण विकासाची नाळ म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा परिषद ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा असून या संस्थेवर निवडून येणारे सदस्य विकासाचा आराखडा तयार करतात. या जिल्हा परिषदेत सध्या भाजपची एकहाती सत्ता आहे. अशीही ही सत्ता गेल्या अडीचवर्षापूर्वी निव्वळ एका सभापतीच्या कारणामुळे विविध कारणांनी चर्चेत आली होती. मात्र, यात इतर पदाधिकारी व सदस्यही विनाकारण गोवले गेले होते. त्यानंतरही भाजपच्याच हातात सत्ता असून नव्याने गठित झालेल्या जलसंधारण विभागाच्या समितीवर दोन अशासकीय सदस्य नेमावयाचे असतात.
त्यामध्ये गोंदियातील एका भाजपच्या महामंत्र्याला संधी देण्यात आली. त्या महामंत्र्याचा तसा त्या यंत्रणेशी काडीमात्र संबंध येत नसला तरी वीटभट्टी आणि रेतीच्या व्यवसायासोबतच ठेकेदारी करण्याचा अनुभव प्रगाढ असा आहे. अशा नामी कंत्राटदार व्यक्तीला जलसंधारण समितीवर का नेमण्यात आले? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
असे असले तरी तीच व्यक्ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत मात्र गोंदिया मतदारसंघातील पोवार, कुणबी जिल्हा परिषद सदस्यांवर पाळत ठेवण्याचे काम करीत होती. ज्या पुनाटोला भागात या महोदयाचे वास्तव्य आहे, त्या भागातून ते महोदय कधी निवडून आले ते सोडा, त्यांनी कधीही निवडणूक लढविलीच नाही. परंतु, ज्यांनी निवडणूक लढवून जिल्हा परिषद व नगरपरिषदेत पोचले त्यांनाच भाजप काय आहे, हे सांगायला चालल्याने त्या महोदयाविरुद्ध चांगलेच वातावरण तापले आहे.
विशेष करून भाजपचे कधी महामंत्रीपद तर कधी दुसरे पद घेऊन निवडणुकीत येणारा भाजपचा पैसा आपल्या हातात कसा राहील, आणि तो वाटप करताना ग्रामीण व शहरी भागातील निष्ठावंत भाजप कार्यकर्ता त्याला सलाम कसा ठोकेल, म्हणजे आपण मोठे असल्याचे दिसेल याच तोèयात वावरणाèया व्यक्तीला निव्वळ भाजपचा पदाधिकारी म्हणून जलसंधारण समितीत ठेवण्यात आले. पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर यांना आता तरी आपण आपल्या यंत्रणेत कुठल्या व्यक्तीला समितीवर नेमून ग्रामीण भागातील चांगल्या अभ्यासू तज्ज्ञावर अन्याय तर केला नाही ना, हा विचार करण्याची वेळ आली आहे.